Last Updated: Sunday, February 10, 2013, 13:08
www.24taas.com, मुंबईदेशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालीय.महिलांवरील अत्याचाराचा हाच मुद्दा आता फेस्टिव्हलमध्येही पाहायला मिळतोय. मुंबईत सुरु असलेल्या काळा घोडा फेस्टिवलमध्ये वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येतेय.
बलात्कार...भ्रूणहत्या... छेडछाड... आणि लैंगिक शोषण.. महिलांवरील अत्याचाराच्या या घटना सध्या मुंबईत सुरु असलेल्या काळा घोडा फेस्टिवलमध्ये सा-यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरतायत... दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर देशभरात महिलांवरील वाढते अत्याचाराबाबत जागरुकता पसरवण्यासाठी विविध कलाकारांनी वेगवेगळ्या थीममार्फत आपल्या कला सादर केल्यात.
घराबाहेर घडणा-याच नाहीतर कौटुंबिक महिला अत्याचाराच्या घटनांबाबतही काळा घोडा फेस्टिव्हलमध्ये भाष्य करण्यात आलंय. काही दिवसांपूर्वी जुहू परिसरात बसमध्ये तरुणीशी झालेल्या छेडछाड प्रकरणावर आधारित कला एका कलाकारानं इथं सादर केलीय. फेस्टिवलला भेट देणा-या नागरिकांना हे जनजागृतीपर प्रदर्शन आकर्षित करतंय.हे प्रदर्शन पाहून कला आणि कलाकारांचं ते तोंडभरुन कौतुक करतायत.
First Published: Sunday, February 10, 2013, 13:08