Last Updated: Tuesday, November 27, 2012, 11:32
www.24taas.com,मुंबईमुंबईल वादग्रस्त आदर्श हाऊसिंग सोसायटी घोटाळ्यातील आरोपी आणि माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी यांचे आज सकाळी निधन झाले.
गिडवाणी यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये सुरू होते.
आदर्श सोसायटी उभारताना नियमांकडे डोळेझाक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. आदर्श घोटाळ्या प्रकरणी गिडवाणींसह अनेक आरोपींना सीबीआयने अटक केली होती.
गिडवानी यांचे बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेले. लहान-मोठ्या निवडणुका लढत त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते विधान परिषद सदस्य होते. त्यांनी काँग्रेसचे प्रवक्तेपदही भूषविले आहे.
First Published: Tuesday, November 27, 2012, 09:46