दुर्देवी घटना: उष्माघात आणि अन्न-पाण्याविना त्यांनी सोडले प्राण

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 19:12

नागपूरमध्ये उष्माघातानं संपूर्ण कुटुंबाचाच बळी घेतल्याचं निष्पन्न झालंय. ६७ वर्षांचे रशीद मोहम्मद आणि त्यांच्या ६३ वर्षांच्या पत्नी बिल्कीस बानो यांचा मृत्यू झालाय. रशीद मोहम्मद यांचा ३ दिवसांपूर्वी उष्माघातानं मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नी या नेत्रहीन असून अथंरूणाला खिळल्या होत्या. रशीद यांच्या मृत्यूनंतर उपासमारीनं त्यांचा मृत्यू झाला.

उष्माघातानं दीड वर्षांच्या ‘गणेशा’चा मृत्यू!

Last Updated: Saturday, May 3, 2014, 16:31

उष्माघातानं चंद्रपूरात पहिला बळी घेतलाय. चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गणेश या दीड वर्षाच्या हत्तीच्या पिल्लाचा उश्माघातानं मृत्यू झालाय.

तमाशा कलावंत बाळू यांचे मिरज येथे निधन

Last Updated: Saturday, April 26, 2014, 14:04

प्रसिद्ध तमाशा कलावंत काळू-बाळू यांच्या जोडीतील `बाळू` म्हणजेच अंकुश खाडे यांचे आज मिरज येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

हरियाणाचा क्रिकेटर संदीप सिंहचा अपघाती मृत्यू

Last Updated: Saturday, February 8, 2014, 15:30

हरियाणाचा प्रथम श्रेणीचा २५ वर्षीय क्रिकेटर संदीप सिंह याचा शुक्रवारी एका अपघातात मृत्यू झाला. हरियाणातील मुंडाल इथं ही दु्र्घटना घडली. ट्रॅक्टरखाली चिरडला गेल्यानं संदीपचा मृत्यू झाला.

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाजवळ बॉम्ब स्फोट, ६ ठार

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 10:23

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पापासून अवघ्या १५ किमी अंतरावर असलेल्या इदिन्तकाराई या गावात गावठी बॉम्बचा स्फोट होऊन सहाजण ठार तर दोन जण जखमी झालेत. मृतांमध्ये तीन मुलांचा समावेश आहे.

माधुरी दीक्षितला पितृशोक

Last Updated: Friday, September 13, 2013, 22:49

अभिनेत्री माधुरी दीक्षित - नेने हिचे वडील शंकर दीक्षित(वय ९१) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यावेळी त्यांचे कुटुंबिय त्यांच्यासोबत होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.

खड्डे चुकवताना विद्यार्थीनीनं गमावला जीव

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 10:17

खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करताना पाठिमागून येणारा ट्रककडे तिचं दुर्लक्ष झालं आणि १७ वर्षीय शितल खंडाळकर या पळासखेड गावातल्या विद्यार्थिनीला आपले प्राण गमवावे लागलेत.

देहू रोड इथे ट्रकने दोघांना उडविले

Last Updated: Thursday, August 22, 2013, 11:08

पिंपरी-चिंचवड जवळील देहू रोड इथ झालेल्या अपघातात PMPML च्या दोन तपासानिकांचा मृत्यू झालाय तर दोनजण गंभीर जखमी झालेत. नंदकुमार किरणकुमार राजपूत, विठ्ठल कृष्णा माळी अस मृत तपासानिकांची नाव आहेत.

बहिणींवर बलात्कार रोखणाऱ्या भावावर झाडली गोळी!

Last Updated: Monday, August 5, 2013, 13:27

पश्चिम बंगालमधील बुरद्वान जिल्ह्यात चार युवकांनी दोन बहिणींवर बलात्कार करून भावाची हत्या केलीय. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय.

सविताच्या मृत्यूनंतर आयर्लंडमध्ये गर्भपाताला मान्यता

Last Updated: Sunday, July 14, 2013, 08:18

आयर्लंडमध्ये गर्भपाताचा कायदा नसल्यामुळे गेल्या वर्षी भारताची सविता हलप्पनावर हिला जीव गमवावा लागला होता. याच धर्तीवर आयर्लंडच्या संसदेमध्ये काल या गर्भपात कायद्याला अनुमती देण्यात आलीय

मराठी कलावंत सतीश तारे यांचं निधन

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 14:25

अभिनेते सतीश तारे यांचं मुंबईत निधन झालंय. अंधेरीतल्या सुजय हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, हे उपचार अपुरे ठरले आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मार्वे समुद्रकिनाऱ्यावर तीन जण बुडाले!

Last Updated: Monday, July 1, 2013, 13:33

एक दुख:द घटना मार्वे या समुद्रकिनाऱ्यावर घडलीय. पोहायला गेलेल्या सात मित्रांपैकी तीन जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय.

एकाच कुटुंबातील पाच जणांवर मृत्यूचा घाला

Last Updated: Monday, May 27, 2013, 12:02

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर रविवारी सायंकाळी कार्ल्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुबातील चार जण जागीच ठार झालेत. तर एकाचा रूग्णालायात मृत्यू झाला. वासकर कुटुंब देवदर्शनासाठी गेले होते.

गुटख्याच्या पुडीवरून गोळीबार, कोल्हापुरात एक ठार

Last Updated: Saturday, May 25, 2013, 09:05

कोल्हापुरातल्या गोळीबारप्रकरणी तीव्र पडसाद उमटले आहेत. विचारे माळ परिसरात २० पेक्षा जास्त चार चाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आलीय. १००हून अधिक तरूणांनी ही तोडफोड केलीय. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

उद्योगपती आर. पी गोयंका यांचे निधन

Last Updated: Monday, April 15, 2013, 06:58

उद्योगक्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ उद्योजक आर. पी गोयंका यांचे रविवाही पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.

मुंबईत पाईपलाईन फुटली, ९ जण बुडाले

Last Updated: Monday, April 8, 2013, 15:37

मुंबईतल्या गोवंडीत महापालिकेची २४ इंचाची पाईपलाईन फुटली. फुटलेल्या पाईपलाईनमधील पाणी परिसरातल्य़ा संजीवनी हौसिंग सोसायटीच्या तळमजल्यात घुसल्यानं ९ जण बुडाले. त्यातल्या ८जणांना वाचवण्यात यश आलयं. तर एकाचा मृत्यू झालाय.

इंग्लंडचे माजी कॅप्टन टोनी ग्रेग यांचे निधन

Last Updated: Sunday, December 30, 2012, 09:52

इंग्लंडचे माजी कॅप्टन आणि प्रसिद्ध कॉमेन्टेटर टोनी ग्रेग यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी ह्रदयविकारच्या झटक्याने ऑस्ट्रेलियाच्या सिडनीत निधन झालं.

कन्हैयालाल गिडवाणी यांचे मुंबईत निधन

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 11:32

मुंबईल वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्यातील आरोपी, माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी यांचे आज सकाळी निधन झाले.

कोकण रेल्वे मार्गावर रात्री विशेष गाडी

Last Updated: Saturday, November 17, 2012, 22:19

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अखा महाराष्ट्रासह देश शोकसागरात बुडाला आहे. कोकणातील शिवसैनिकांसाठी मुंबईत येणाऱ्यासाठी मडगाव ते मुंबई खास रेल्वे सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही रेल्वे रात्री दहावाजता मडगाववरून सुटेल.

गणितज्ज्ञ डॉ. श्रीराम अभ्यंकर यांचं निधन

Last Updated: Sunday, November 4, 2012, 10:56

आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवलेले मराठमोळे ख्यातनाम गणितज्ज्ञ डॉ. श्रीराम अभ्यंकर यांचं निधन झालंय. ते ८२ वर्षांचे होते. डॉ. श्रीराम अभ्यंकरांचा जन्म १९३० मध्ये भारतातील मध्यप्रदेशात उज्जैन येथे झाला.

दहीहंडीदरम्यान ठाण्यात गोविंदाचा मृत्यू

Last Updated: Friday, August 10, 2012, 23:35

ठाण्यात दहीहंडी उत्सवादरम्यान एका गोविंदाचा मृत्यू झालाय. तर रायगड जिल्ह्यात थरावरुन पडून एका गोविंदाचा मृत्यू झालाय.