Last Updated: Thursday, March 28, 2013, 19:41
www.24taas.com,मुंबईमुंबई पोलिसांनी तीन अशा महिलांना अटक केली आहे ज्या महिला मुंबईतील महागड्या कपड्याच्या शोरूममध्ये जाऊन तेथील कपड्यांची चोरी करत. नेपेन्सी रोड या हाय प्रोफाईल भागातील एका मोठ्या कपड्याच्या शोरूममधून तीन महिलांनी पन्नास हजार रुपयांच्या कपड्यांची चोरी केली आणि त्या फसल्या.
शोरूममध्ये लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये या महिलांनी केलेली चोरी कैद झाल्यानं त्यांचा भांडाफोड झाला. या तीन महिला कपड्याच्या शोरूममध्ये शिरल्या आणि नंतर कोणी बघत नाही याचा फायदा घेऊन या तीन महिलांपैकी एका महिलेने काही कपडे आपल्या बागेत भरले. या तिन्ही महिलांनी दुकानात एकूण तीन ठिकाणी चोरी केली. हा प्रकार सीसीटीवी कैमरेत कैद झाला. या तीन्ही महिला शोरुमच्या दूसरया भागत गेल्या. तिथे ही त्याच प्रकारे चोरी केली.
पण शोरूममध्ये सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लागले होते. त्यामुळे या महिलांची चोरी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. आणि सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने पोलिसांनी या महिलांना पकडलं. या आधीही या महिलांनी अनेक मोठ्या शोरूममध्ये चोरी केल्या आहेत.
First Published: Thursday, March 28, 2013, 19:39