`सीएसटी` रेल्वे स्टेशनच्या शौचालयात महिलेनं घेतलं जाळून, lady burnt in CST railway station toilet

`सीएसटी` रेल्वे स्टेशनच्या शौचालयात महिलेनं घेतलं जाळून

`सीएसटी` रेल्वे स्टेशनच्या शौचालयात महिलेनं घेतलं जाळून

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई सीएसटी रेल्वे स्थानकावरील रेल्वे सुरक्षा अधिकारी इमारतीतील सार्वजनिक शौचालयात एका महिलेचा रहस्यमयरित्या जळून मृत्यू झालाय. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान हr घटना घडलीय. अनिता पटेल असं या महिलेचं नाव असून तिने स्वतः जाळून घेतलं की , तिला जाळ्यात आलं? याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.

मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या सीएसटी स्थानकावर रेल्वे सुरक्षा कार्यालयाच्या शेजारील प्रसाधन गृहातून अचानक आगीच्या ज्वाला दिसू लागल्यानं गर्दीनं आणि पोलिसांनी तिकडे धाव घेतली. तोपर्यंत अनिता पेटल संपूर्णत: भाजून निघाली होती.

या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आली आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 26, 2013, 16:54


comments powered by Disqus