दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘सिडको’ची खुशखबर!, lottery by cidco in diwali

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘सिडको’ची खुशखबर!

दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘सिडको’ची खुशखबर!

www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई

नवी मुंबईत घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी ‘सिडको’ दिवाळीच्या शुभमुहूर्तावर खुशखबर देण्याच्या तयारी आहे. होय... कारण, याचवेळी सिडकोच्या ७,५०० घरांसाठी सोडत काढण्यात येणार असल्याची माहिती सिडको अध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांन दिलीय.

नवी मुंबईच्या खारघर सेक्टर ३६ सिडकोनं साडे सात हजार घरांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प उभारलाय. या प्रकल्पाचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय. उच्च, मध्यम व अल्प उत्पन्न घटकांना समोर ठेवून हे गृहप्रकल्प उभारले जात आहेत. या दोन्ही प्रकल्पांचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. सिडकोने मागील काही वर्षांपासून पुन्हा गृहनिर्मितीवर आपले लक्ष केंद्रित केलंय.

या घरांच्या किंमती मात्र अजून निश्चित झालेल्या नसल्या तरी किंमती निश्चित करण्यासोबतच सोडतीची संपूर्ण योजना आखण्याची प्रक्रिया सुरू झालीय. त्यामुळे पुढील काही दिवसांत याबाबतची संपूर्ण योजना तयार करून साधारण दिवाळीच्या मुहूर्तावर घरांची सोडत काढली जाईल, अशी माहिती हिंदुराव यांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 9, 2013, 15:09


comments powered by Disqus