Last Updated: Monday, December 16, 2013, 19:03
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराज्यातल्या औषध विक्रेत्यांचा संप मागे घेण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयात मेडिकल असोसिएशनननं ही घोषणा केली.
वेगवेगळ्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून तीन दिवसांचा संप असोसिएशनं पुकारला होता. पण, १९ डिसेंबरला राज्य सरकार मेडिकल शॉप ओनर असोसिएशनबरोबर बैठक करणार असल्याची माहिती सरकारी वकीलांनी आज कोर्टात दिली.
त्यावर मेडिकल असोसिएशननं आपला संप मागं घेण्याची घोषणा केली. याबाबतची पुढची रणणिती १९ तारखेच्या बैठकीनंतर निश्चित केली जाईल, असं असोसिएशननं सांगितलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 16, 2013, 19:03