Last Updated: Monday, December 16, 2013, 19:13
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराज्यातल्या औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या तीन दिवसांच्या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळालाय. तर दुसरीकडे मनसेनं या बंदविरोधात भूमिका घेतली आहे.
ठाण्यात केमिस्ट असोसिएशनच्या बैठकीत मनसैनिकांनी गोंधळ घातला. विविध मागण्यांसाठी मेडिकल असोसिएशननं पुकारलेला ३ दिवसांचा राज्यव्यापी बंद हा चुकीचा असून, मेडिकल दुकानं सर्वसामान्यांकरता खुली असावीत, अशी भूमिका मनसेनं घेतली. आणि खळ्ळखट्याकचा इशाराही दिला. .
ऐन नागपूर अधिवेशनाच्या काळात आरोग्य रक्षणाच्या नावाखाली अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून सुरु असलेली राज्यातील औषध विक्रेत्यांनी आजपासून तीन दिवसांचा बंद पुकारला होता. औषध विक्रेते १८ डिसेंबरला नागपूरला मोर्चाही काढणार होते. जनतेच्या आरोग्य रक्षणाचा मुद्दा पुढं करत अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाईचा धडाका सुरु केलाय. याचा निषेध म्हणून औषध विक्रेत्यांनी हा बंद पुकारला.
एफडीएच्या औषध दुकानांवरील छापा अवैध आहेत, ते थांबवावेत, काहीही कारणांवरुन परवाना निलंबित करण्याचा प्रकार थांबवावा, औषध विक्रेत्यांना त्यांची बाजू मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी औषध विक्रेत्यांची आहे. विविध कारणांनी तीन ते साडेतीन हजार औषध विक्रेत्यांची रद्द झालेली लायसन्स परत मिळावीत, औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी समिती स्थापून त्यावर निर्णय घ्यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याची अंमलबजावणी करावी, असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, December 16, 2013, 19:13