थीम पार्कबाबत अश्वासन दिलेलं नाही- मुख्यमंत्री Maharashtra CM On Uddhav Thackrey Theme Park

थीम पार्कबाबत अश्वासन दिलेलं नाही- मुख्यमंत्री

थीम पार्कबाबत अश्वासन दिलेलं नाही- मुख्यमंत्री
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्कबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना कोणतेही आश्वासन दिलेलं नाही, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.

थीम पार्कबाबत मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेकल्यानंतर दिली होती. मुख्यमंत्र्यांना थीम पार्केचे संकल्पचित्र दाखवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

मात्र थीम पार्कबाबत कोणतेही ठोस आश्वासन दिलं नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळं पुन्हा एकदा रेसकोर्सच्या कराराबाबत वाद रंगणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, June 3, 2013, 21:18


comments powered by Disqus