महात्मा गांधींच्या पत्रांचा लिलाव mahatma gandhi letters sold in auction

महात्मा गांधींच्या पत्रांचा लिलाव

महात्मा गांधींच्या पत्रांचा लिलाव
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राष्ट्रपिता महात्मा गांधीच्या दोन दुर्मिळ पत्रांचा लिलाव करण्यात आला. महात्मा गांधींची ही दोन्ही पत्रं अनुक्रमे ११.५ आणि ९ लाखांना विकण्यात आली. हा लिलाव मुंबईतील `विवांता बाय ताज` हॉटेलमध्ये करण्यात आला.

महात्मा गांधींची ही पत्रे गुजराती भाषेत आहेत. गांधी पत्रात लिहितात की, "आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून कार्य करा. इतर लोक काय सल्ला देतात हा धर्म नाही. स्वत:च्या मनात ज्या गोष्टीबद्दल विश्वास असतो, तोच धर्म आहे. दुसरे कोणी तुमच्या मनातील कसे काय ओळखू शकतं? त्यामुळे इतरांवर विश्वास न ठेवता, आपला रस्ता ओळखण्यास मदत व्हावी एवढीच प्रार्थना देवाकडे करा. तोच खरा मार्गदर्शक आहे."

या दुर्मिळ पत्रांचा लिलाव १ ते २ लाख रुपयांत होणार असे वाटत होते. यातील पहिले पत्र महात्मा गांधींनी आपल्या नात्यातील एका तरुणाला वर्धा येथून १० ऑगस्ट १९३५ साली लिहिले होते. तर दुसरे पत्र गांधीजींच्या एका सहकाऱयाने ५ ऑक्टोबर १९३५ साली लिहिलेले आहे. हे पत्र देखील गुजराती भाषेत असून यावर महात्मा गांधींची स्वाक्षरी आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 29, 2014, 22:04


comments powered by Disqus