Last Updated: Tuesday, January 14, 2014, 09:47
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसेना भाजप, आरपीआय आठवले गट आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी सेतकरी संघटना यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत रंगशारदा इथं संध्याकाळी होत आहे.
लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे, असं असलं तरी पुढली काही दिवसांत होणारी राज्यसभेची निवडणूक हाच बैठकीचा मुख्य मुद्दा राहण्याची शक्यता आहे.
महायुतीमध्ये शिवसेना २२ आणि भाजप २६ हे जागा वाटपाचं सूत्र नक्की झालं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं याआधी ९ जागा लढवण्याचं जाहीर केलं होतं. मात्र महायुतीकडे त्यांच्या ४ जागांचा आग्रह आहे. आरपीआयनंही महायुतीकडे ६ जागांची मागणी केलीय. ते ३ जागांसाठी आग्रही आहेत... या सगळ्या प्रश्नांसंदर्भात आज बैठकीत चर्चा होण्याची शक्यताय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 14, 2014, 09:47