प्रियकरानं प्रेयसीला पाजलं अॅसिड, तरुणाला अटकMan allegedly forces Mumbai girl to drink acid

प्रियकरानं प्रेयसीला पाजलं अॅसिड, तरुणाला अटक

प्रियकरानं प्रेयसीला पाजलं अॅसिड, तरुणाला अटक
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

मुंबईत अॅसिड हल्ल्याची पुन्हा एक घटना घडलीय. शहरातील गोराई बिचवर काल रात्री एका १८ वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकरानं जबरदस्तीनं अॅसिड पाजल्याचा प्रकार घडलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिची प्रकृती गंभीर आहे. तर तरुणाला पोलिसांनी अटक केलीय.

शनिवारी एक तरुणी आणि तिचा प्रियकर यांच्यात दुपारी गोराई बिच परिसरात वाद सुरू असताना तरुणीच्या ओरडण्याचा आवाज रिक्षाचालकांनी ऐकला. त्यांनी ही घटना पोलिसांना कळवली. पोलिसांनी तरुणीला कांदिवली इथल्या शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. जितेंद्र सकपाळ (वय २१) या तरुणानं या मुलीला ऍसिड पाजून तिला समुद्रात ढकलून दिलं होतं. त्याला अटक करण्यात आली आहे.

तरुणीचा चेहरा दहा टक्के भाजला असून, अंतर्गत काही जखमा आहेत का, याची तपासणी करण्यात येतेय. हे दोघंही एकमेकांना चांगले ओळखत असून, दोघंही दहिसर इथले रहिवासी असल्याचं कळतंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, October 20, 2013, 12:00


comments powered by Disqus