Last Updated: Thursday, July 18, 2013, 19:45
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईगेल्या सहा महिन्यांपासून मुंबईतील सुमारे ३५ ते ४० महिलांना अश्लील एसएमएस करून हैराण करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. अभिजीत खरे असे या तरुणाचं नाव असून तो जयपूरचा रहिवासी आहे.
अभिजीत हा चांगल्या घरातला ३३ वर्षीय सुशिक्षित तरुण आहे. त्याने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं होतं. तसंच इंग्रजीही चांगलं बोलतो. मात्र त्याला महिलांचे मोबाईल नंबर मिळवून त्यांना अश्लील एसएमएस करण्याचं विकृत व्यसन लागलं. काहीवेळा तो महिलांना कॉल करून अश्लील बोलायचा. यासंदर्भात एका महिलेने मुंबईतील मलबार हिल येथील पोलीस स्टेशनात तक्रार नोंदवली. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड्स तपासल्यावर हा नंबर जयपूरचा असल्याचं समजलं. यावर मलबार हिल पोलिसांनी अभिजीतला जयपूरला जाऊन अटक केलं.
अभिजीतने ३५ ते ४० महिलांना अश्लील एसएमएस केले होते. यातील काही महिला मुंबईच्या होत्या. अभिजीतचा भाऊ पोलीस दलातच असल्यामुळे तो आपल्याला वाचवेल असा अभिजीतचा गैरसमज होता. मात्र मुंबई पोलिसांपुढे त्याचं काही चाललं नाही.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, July 18, 2013, 19:45