माणिकरावांचे अजितदादांना प्रत्युत्तर, manikrao thackeray lash out ajit pawar

माणिकरावांचे अजितदादांना प्रत्युत्तर

माणिकरावांचे अजितदादांना प्रत्युत्तर
www.24taas.com, मुंबई
यंदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच जागा वाढवण्याची मागणी करेल, असं सांगत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जागा वाढवून देण्याच्या राष्ट्रवादीच्या मागणीवर टीकास्त्र सोडलय.

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काय झालं, याचा इतिहास ताजा असल्याचंही ते म्हणालेत. तसचं चार वेळा विधानसभेवर निवडून आल्याचं सांगत त्यांनी अजित पवारांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलय.

आपल्या मतदारसंघात एकदाही निवडून न येणारे आमच्यावर टीका करतात, असे काल अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात म्हटले होते. त्या टीकेला आज माणिकराव ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काल अजित पवार यांनी काँग्रेस, मुख्यमंत्र्यांसह अनेकांना लक्ष्य केले होते. त्याबद्दल काँग्रेस काय प्रतिक्रीया व्यक्त करते याकडे सर्वांचे लक्ष लागू होते.

First Published: Monday, October 22, 2012, 19:13


comments powered by Disqus