Last Updated: Monday, June 23, 2014, 17:15
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर आज दुपारी आग लागली होती, ही आग शॉर्टसर्किंटमुळे लागली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही आग विझवण्यात यश आलं आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंबही दाखल झाले होते. ही आग मोठी नसल्याचं सांगण्यात येतंय.
मात्र या आगीत नेमकं काही नुकसान झालंय का हे अजून समजू शकलेलं नाही.
मंत्रालयात यापूर्वी मोठी आग लागली असल्याने, आताही लोकांच्या मनात घबराट पसरली होती, सुदैवाने ही आग लवकर आटोक्यात आली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, June 23, 2014, 17:15