Last Updated: Sunday, September 16, 2012, 11:56
www.24taas.com,मुंबईडिझेल दरवाढ आणि एफडीआयला विरोध करत शिवसेनेनं शिवाजी पार्क ते प्रभादेवी असा मोर्चा काढलाय. शिवसेना नेता मनोहर जोशी यांच्यासह अनेक नेते आणि शिवसैनिक मोर्चात सहभागी झालेत.
महागाईच्या मुद्यावर शिवसेनेनं जोरदार शक्तीप्रदर्शनं केलं. जवळपास सात ते आठ हजार शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत. सर्वसामान्यांना महागाईच्या आणखी खाईत टाकणारी डिझेल, गॅसच्या दरातील भरमसाठ वाढ तात्काळ मागे घ्यावी, या मागणीसाठी केंद्रातील सरकारविरोधात सेनेने दादरमध्ये शक्तीप्रदर्शन केले.
या मोर्चाचे नेतृत्व युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. मोर्चात शिवसेनेच ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, खासदार संजय राऊत, दिवाकर रावते आणि अन्य प्रमुख नेते उपस्थित होते. शेकडो शिवसैनिक सायकल घेऊन या मोर्चात उतरले आहेत.जवळपास सहा हजार लोक सहभागी झाल्याचा दावा करण्यात येत आहे.
First Published: Sunday, September 16, 2012, 11:19