Last Updated: Tuesday, May 27, 2014, 11:37
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमारूतीने मध्यम वर्गीयांना परवडेल अशी आणखी एक कार बाजारात आणली आहे.
कारण मारूतीची सेलेरिओ आता सीएनजीवर चालणार आहे तसेच या कारची किंमत फक्त 4 लाख 68 हजार आहे.
मारूतीची सेलेरिओ सर्वांच्या पसंतीला पडेल अशी अपेक्षा कंपनीला आहे. सर्वसाधारणपणे पाच लाखांपर्यंत ही कार तुमच्या दारात येऊन थबकणार आहे.
भारतीय कॉम्पॅक्ट कारच्या आखाडय़ावर काहीशी उशीरा उतरविण्यात आलेल्या मारुतीच्या `सेलेरिओ`ला हरित साज अर्थात सीएनजी इंधनावरील आवृत्तीचे रूपही देण्यात आले आहे.
सेलेरिओ ग्रीन नावाने ही कार ४.६८ लाख रुपयांना (एक्स शोरूम-नवी दिल्ली) उपलब्ध होईल.
ऑटो गिअर शिफ्ट तंत्रज्ञान सुविधा असलेली पेट्रोल इंधनावरील ही कार कंपनीने सर्वप्रथम गुरगावच्या आंतरराष्ट्रीय वाहन मेळ्यात सादर केली होती. तिची किंमत ४.०६ लाख रुपये आहे.
नव्या इंधन प्रकारातील सेलेरिओ प्रति किलो गॅस ३१.७९ किलोमीटर क्षमता प्रदान करेल.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, May 27, 2014, 11:35