मेट्रो रेल्वेचा पूल कोसळला, १ ठार, १३ जखमी, Metro bridge mishap in Mumbai as slab collapses

मेट्रो रेल्वेचा पूल कोसळला, १ ठार, १३ जखमी

मेट्रो रेल्वेचा पूल कोसळला, १ ठार, १३ जखमी
www.24taas.com, मुंबई
मुंबईतील अंधेरी भागात मेट्रो रेल्वेचा पूल कोसळल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार, तर जवळपास १३ जण जखमी झाले आहेत. अंधेरी-कुर्ला रस्त्यावरील हॉटेल लीला आणि मुकुंद नर्सिंग होमच्या दरम्यान ही घटना घडली.

या अपघातातील जखमी झालेल्यांना जवळच्या सेवन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले असता एकाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील सुत्रांनी सांगितले आहे.

सध्या घटनास्थळी १० अग्नीशामक दलाच्या गाड्या पोहचल्या असून ढिगारा काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.

कालच्या पावसामुळे हा पूल कोसळला नसून पुलाचे बांधकाम सुरू होते. त्या बांधकाम सुरू असलेल्या पुलाचा भाग कोसळल्याचे सांगितले आहे.

First Published: Tuesday, September 4, 2012, 17:14


comments powered by Disqus