आमरसाचा चमचा भाजीत घातल्याने खून

Last Updated: Friday, May 23, 2014, 08:46

विवाहसमारंभात जेवण तयार करताना आमरसाचा चमचा भाजीत घातल्याने रागावलेल्या कॅटर्सच्या कामगाराने दोघा आचार्यांएवर चाकूने हल्ला केल्याची घटना गिरगाव परिसरात घडली. या हल्ल्यात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला.

हप्ता मागणाऱ्या गुंडाना चोप, एकाचा मृत्यू

Last Updated: Friday, January 10, 2014, 13:59

रत्नागिरीतल्या खाऊ गल्लीत विक्रेत्यांकडे हप्ता मागायला गेलेल्या दोन गुंडांना विक्रेत्यांनी चोप दिलेला वासीन मोमीन उर्फ उंड्याचा मृत्यू झालाय... .

‘त्या’ चार मित्रांना मिळाली जलसमाधी

Last Updated: Thursday, November 7, 2013, 18:22

पुण्यातून बेपत्ता झालेल्या चार मित्रांचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश मिळालंय. या चारही मित्रांना जलसमाधी मिळाली. चौघांचेही मृतदेह नीरा नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अचानक बेपत्ता झालेल्या चार मित्रांच्या गाडीचा शोध लागला. याच गाडीत तिघांचे मृतदेह आढळले आहेत.

‘त्या’ तरुणांची गाडी सापडली, तिघं कुठे?

Last Updated: Thursday, November 7, 2013, 13:10

पुण्यातून बेपत्ता झालेल्या चार मित्रांचं गूढ उलगडण्याची शक्यता आहे. अचानक बेपत्ता झालेल्या चार मित्रांच्या गाडीचा शोध लागलाय. नीरा नदीच्या पात्रात दोन पुलांच्यामध्ये पाण्याखाली ही गाडी सापडलीय.

`रेल्वे`गर्दीचा आणखी एक बळी, दोन जखमी

Last Updated: Monday, July 22, 2013, 09:08

लोकलमधून पडून एकाचा मृत्यू झालाय तर दोघे गंभीर झालेत. कर्जत-सीएसटी लोकलमधून पडल्यानं ही दुर्घटना घडलीय.

सांगलीत शेतकऱ्यांवर गोळीबार, दोन ठार

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 08:33

शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात दोन शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला आहे. सांगलीत आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

अकोल्यात संतप्त जमावाकडून गुंडाची हत्या

Last Updated: Monday, October 22, 2012, 18:57

नागपूरनंतर आता अकोल्यात संतप्त जमावाकडून युवकाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घ़डलीय. गरबा रास खेळणा-या महिलांची छेड काढल्यानं संतप्त जमावान योगेश चव्हाण या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाला संतप्त जमावानं जबर मारहाण केल्यानं यात त्याचा मृत्यू झाला.

ओव्हरहेड वायरला चिटकून एकाचा मृत्यू; हार्बर रेल्वे विस्कळीत

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 10:55

हार्बर लाईनवर ओव्हरहेड वायरला चिटकून एका प्रवाशाचा मृत्यू झालाय. त्यामुळे रेल्वेची हार्बर लाईनवरची वाहतूक विस्कळीत झालीय.

पोलिसाचं रॅश ड्रायव्हिंग, तरुणाचा हकनाक बळी

Last Updated: Friday, September 7, 2012, 12:39

एरव्ही, रॅश ड्रायव्हिंग संदर्भात कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या रॅश ड्रायव्हिंगमुळे एका तरूणाचा हकनाक बळी गेलाय. विक्रोळी सुंदरनगर परिसरात घडलेली ही घटना आहे.

मेट्रो रेल्वेचा पूल कोसळला, १ ठार, १३ जखमी

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 22:16

मुंबईतील अंधेरी भागात मेट्रो रेल्वेचा पूल कोसळल्याने झालेल्या अपघातात जवळपास २० जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अंधेरी-कुर्ला रस्त्यावरील हॉटेल लीला आणि मुकुंद नर्सिंग होमच्या दरम्यान ही घटना घडली.