मुंबई विधानभवनात दोन आमदारांमध्ये शिवीगाळ, MLA Issue in mumbai Vidhanbhavn

मुंबई विधानभवनात दोन आमदारांमध्ये शिवीगाळ

मुंबई विधानभवनात दोन आमदारांमध्ये शिवीगाळ
www.24taas.com, मुंबई

मुंबईतल्या विधानभवन परिसरात दोन आमदारांमध्ये आज चांगलीच हमरीतुमरी झाली. राष्ट्रवादीचे आमदार संदीप बाजोरिया आणि शेकाप पक्षाचे आमदार जयंत पाटील एकमेकांना भिडले. शिवीगाळ करत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार घडला.

आमदार संदीप बाजोरिया यांना जयंत पाटील यांनी काही टोमणा मारल्यामुळे संदीप बोजारिया यांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाली. जयंत पाटील ह्यांनी सिंचन घोटाळ्यात संदीप बाजोरिया यांच्यावर काही आरोप केल्याने त्यांच्या राग अनावर झाल्याचे समजते.

त्यामुळे विधानभवन परिसरातच या दोन्ही आमदारांमध्ये चांगलीच जुंपली. त्यामुळे जनतेचे प्रतिनिधीत्व करणारे आमदारच जर असे वागू लागल्यास कायदाचा धाक कोणाला राहणार असा प्रश्न विचारला जातोय.

First Published: Tuesday, February 12, 2013, 17:06


comments powered by Disqus