मनसेचे बिसलेरीविरोधात आंदोलन, दुष्काळग्रस्तांना मदत करा, mns againest bisleri company

दुष्काळग्रस्तांना मदत, मनसेचे बिसलेरीविरोधात आंदोलन

दुष्काळग्रस्तांना मदत, मनसेचे बिसलेरीविरोधात आंदोलन
www.24taas.com, मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं अंधेरीतल्या बिसलेरी कंपनीसमोर आंदोलन करण्यात आलं. राज्याला दुष्काळाचे भयाण चटके बसत असताना बिसलेरीसारख्या पाणी विकणा-या कंपन्या राज्याचेच पाणी वापरुन कोट्यवधी रुपये कमावत आहे.

मनसे बिसलरीला विरोध करीत अशा कंपन्यांनी काही दुष्काळग्रस्त गावं दत्तक घ्यावीत किंवा आर्थिक स्वरुपात मदत करावी. अशी मागणी केली. आणि त्याचसाठी त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी बिसलेरी प्रशासनानं मनसे आंदोलकांसोबत बैठक घेऊन मदत करण्याचं आश्वासन दिलं.


बिसलेरीबरोबरच इतर पाणी विकणा-या कंपन्यांनाही निवेदन देवून दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आवाहन करणार असल्याचं मनसेनं स्पष्ट केलं.

First Published: Thursday, April 25, 2013, 10:29


comments powered by Disqus