मनसेच्या दहीहंडीला शिवसेनेची उपस्थिती, MNS vs Shiv Sena

मनसेच्या दहीहंडीला शिवसेनेची उपस्थिती

मनसेच्या दहीहंडीला शिवसेनेची उपस्थिती
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गो गो गोविंदाचा नारा देत आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीची दहीहंडीच्या मुहूर्तावर मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. याची झलक दादरमध्ये पाहायला मिळाली. चक्क दादरमध्ये मनसे, शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभेचीच रंगीत तालीम दिसून आली. मात्र, यात मनसेनेने आपल्या दहीहंडी कार्यक्रमाला शिवसेना मंडळाना आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले.

दहीहंडीच्या उत्सव साधून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीन शिलेदारांची नावे जाहीर केल्याचं एका वृत्तपत्रानं म्हटलं आहे. त्यामुळे उत्सावाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक उमेदवारांची नावे जाहीर करून मनसेनेने बाजी मारल्याचीच चर्चा सुरू होती.

मुंबईतील दहीहंडीवरील प्रसिद्धीचा झोत पाहून राजकीय चढाओढ दिसून आली. दादरच्या हंडय़ांसाठी गर्दी खेचण्यासाठी आता भाजपा-मनसेमध्ये स्पर्धा सुरू झाली असून थेट शिवसेनेच्या मंडळांनाही आकर्षित करत मनसेने यात बाजी मारल्याचे चित्र दादरमध्ये दिसले.

दादरमधील आयोजकांनी शिस्तीचे दर्शन घडवत गोविंदांची सुरक्षा जपली. अति उंच हंडी आणि त्यासाठी लाखोंची बक्षिसे, डीजे-डॉल्बीचा दणदणाट आणि वाहिन्यांच्या थेट प्रक्षेपणाच्या जीवावर ठाण्यातील राजकीय दहीहंडय़ा प्रसिद्धीच्या झोतात आल्या. त्यापूर्वी दादर रेल्वेस्थानकाबाहेरची दहिहंडी प्रसिद्ध होती. दादरच्या रानडे रस्त्यावर दहीहंडी उत्सवात भाजप-मनसेत स्पर्धा झाली. आगामी निवडणुकीच्या प्रचाराचे रंगही गुरुवारी पाहायला यानिमित्ताने मिळाली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 30, 2013, 13:00


comments powered by Disqus