Last Updated: Friday, August 30, 2013, 21:08
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गो गो गोविंदाचा नारा देत आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीची दहीहंडीच्या मुहूर्तावर मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. याची झलक दादरमध्ये पाहायला मिळाली. चक्क दादरमध्ये मनसे, शिवसेना आणि भाजपमध्ये रंगीत तालीम दिसून आली. मात्र, यात मनसेनेने आपल्या दहीहंडी कार्यक्रमाला शिवसेना मंडळाना आपल्याकडे खेचण्यात यश मिळविले.