मॉडेल अंजुम नायरची पोलिसांना शिवीगाळ, model abusing police

मॉडेल अंजुम नायरची पोलिसांना शिवीगाळ

मॉडेल अंजुम नायरची पोलिसांना शिवीगाळ
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतली मॉडेल आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अंजुम नायरला पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणी अखेर या मुजोर अंजूमला अटक करण्यात आलं आहे.

ओशिवरातल्या समर्थ आंगन सोसायटीत राहणा-या अंजून नायरनं आपल्या मित्र-मैत्रिणींसह मोठ्यानं म्युझिक लावून रात्री उशिरापर्यंत धिंगाणा घातला. त्यामुळं सोसायटीतल्या रहिवाशांनी पोलिसांत तक्रार केली. त्यावर कारवाईसाठी आलेल्या पोलिसांना अंजूमनं अश्लिल शिव्या दिल्या.

पोलीस आयुक्तांना अश्लील शिव्या देताना दिल्ली येथील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाबद्दल मुंबई पोलिसांना जबाबदार धरत या उद्दाम मॉडेलने अतिशय खालच्या पातळीवरील भाषेत शिव्या दिल्या.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 7, 2013, 18:54


comments powered by Disqus