Last Updated: Tuesday, October 8, 2013, 09:38
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईपोलिसांना शिवीगाळ करणाऱ्या मॉडेल अंजुम नायरला आज अंधेरी कोर्टात हजर केलं जाणार आहे. पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी अंजूम नायरला काल ओशिवरा पोलिसांनी अटक केली होती.
ही मॉडेल त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होती, असंही चौकशीत निष्पन्न झालंय. अंधेरी पश्चिमेतील समर्थ आंगण या इमारतीच्या २०व्या मजल्यावरून रात्री दोन वाजण्याच्या सुमारास साऊंड सिस्टिमचा खूप आवाज येत होता. इमारतीतल्या रहिवाशांनी होत असलेल्या त्रासाबद्दल पोलीस तक्रार केली असता घरी आलेल्या पोलिसांनी अंजुम नायरनं शिवीगाळ केली. पोलीस आयुक्तांना अरेतुरे करत शिव्यांची लाखोळी वाहिली.
रात्री या मॉडेलला दंड आकारून सोडण्यात आलं होतं. परंतु, तिच्या वर्तणुकीची व्हिडीओ क्लिप मोबाईल आणि सोशल नेटवर्किंग साइटवरून प्रसारित झाल्यानंतर या मॉडेलला पोलिसांनी अटक केली असून आज तिला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Tuesday, October 8, 2013, 09:38