मुंबईतील मोनो रेलचे भाडे सर्वात कमी...सामान्यांना मिळणार दिलासा, mono rail Fair in Mumbai

मुंबईतील मोनो रेलचे भाडे सर्वात कमी...सामान्यांना मिळणार दिलासा

मुंबईतील मोनो रेलचे भाडे सर्वात कमी...सामान्यांना मिळणार दिलासा
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईत प्रवास करताना कमी खर्चात आणि तोही एसीमधून करताना जास्त पैस द्यावे लागणार नाही. मुंबईत डिसेंबरमध्ये मोनो धावणाची शक्यता आहे. तशी घोषणाही झाली आहे. मात्र, मोनोतून प्रवास करताना कमी पैसे मोजावे लागणार आहेत. बेस्ट, रेल्वे, शेअर टॅक्सीपेक्षा कमी भाडे असणार आहे. किमान ५ रूपये भाडे असणार आहे.

मोनो सुरू झाल्यानंतर त्याचे भाडे किमान ५ रुपये आणि कमाल १९ रुपये असणार आहे. हे भाडे दहा वर्षे कायम राहणार आहे. मोनो रेल भाड्याबाबतच्या प्रस्तावावर राज्य सरकारने बुधवारी शिक्कामोर्तब केले. देशातील पहिल्याच मोनो रेलच्या गेल्या सहा माहिन्यापासून चाचण्यावर चाचण्या घेतल्या जात आहेत. पहिल्या टप्यात चेंबूर ते वडाळा तर दुसऱ्या टप्यात संत गाडगेबाबा चौक, सात रस्त्यापर्यंत मोनो धावणार आहे.

मुंबईत प्रवास करताना सर्वात कमी खर्चाचा प्रवास हा मोनो रेलचा असणार आहे. याआधी रेल्वेचा प्रवास स्वस्त होता. आता रेल्वेचेही भाडे वाढल्याने मुंबईकर हैराण झाला आहे. त्यात बेस्टचाही प्रवास महागला आहे. त्यामुळे मोनो रेल सुरू झाल्यानंतर प्रवासीवर्गाला दिलासा मिळणार आहे.

मोनो रेलेच्या भाडेपत्रकास राज्य सरकारने बुधवारी मान्यता दिली. त्यानुसार पहिल्या तीन किमीसाठी ५ रुपये, तर त्यानंतरच्या दोन किमीसाठी ७ रुपये असे भाडे असेल. दर १० वर्षांनी भाडय़ाची पुनर्रचना होईल. भाडेदरवाढीचा निर्णय घेण्याचे अधिकार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास असणार आहेत. तसे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.

मोनोचे तिकिट दरपत्रक
अंतर ०-३ किमी - भाडे ५ रूपये
अंतर ३-५ किमी - भाडे ७ रूपये
अंतर ५-७ किमी - भाडे ९ रूपये
अंतर ७-१० किमी - भाडे ११ रूपये
अंतर १०-१५ किमी - भाडे १४ रूपये
अंतर १५ -२० किमी - भाडे १५ रूपये
तर २० किमी अधिक अंतरासाठी १९ रूपयांपुढे अधिक भाडे आकारण्यात येणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, November 28, 2013, 10:52


comments powered by Disqus