`एक्स्प्रेस वे`वरील टोलच्या रकमेत अठरा टक्यांनी वाढ

Last Updated: Monday, March 31, 2014, 13:19

पुणे-मुंबई `एक्स्प्रेस वे`वरील टोलच्या रकमेत अठरा टक्यांनी वाढ होणार आहे. उद्यापासून हे नवे दर लागू होणार असून टोलची नवीन दरवाढ २०१७पर्यंत राहाणार आहेत.

खुशखबर : गिरणी कामगारांना मिळणार हक्काची घरे

Last Updated: Friday, February 21, 2014, 19:46

गिरणी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश आलंय. भाडेतत्त्वावरील एमएमआरडीए बांधत असलेली ५० टक्के घरे गिरणी कामगारांना देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे १७ ते १८ हजार गिरणी कामगारांना घरे मिळणार आहेत.

मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत, सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 09:45

मुंबई कधी धावणार मोनो, असा प्रश्न आता विचारला जाणार नाही. कारण ही मोनोरेल लवकरच मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. मोनरेलचे आवश्यक असणारे एमएमआरडीला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे मोनोरेल धावण्यासाठी सज्ज झाली आहे. मोनोचा पहिला प्रवास हा चेंबूर-वडाळा असणार आहे.

मुंबईतील मोनो रेलचे भाडे सर्वात कमी...सामान्यांना मिळणार दिलासा

Last Updated: Thursday, November 28, 2013, 10:52

मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. मुंबईत प्रवास करताना कमी खर्चात आणि तोही एसीमधून करताना जास्त पैस द्यावे लागणार नाही. मुंबईत डिसेंबरमध्ये मोनो धावणाची शक्यता आहे. तशी घोषणाही झाली आहे. मात्र, मोनोतून प्रवास करताना कमी पैसे मोजावे लागणार आहेत. बेस्ट, रेल्वे, शेअर टॅक्सीपेक्षा कमी भाडे असणार आहे. किमान ५ रूपये भाडे असणार आहे.

मुंबईतील मोनो रेल्वेला अखेर मुहूर्त !

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 08:59

मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज आहे. मुंबईकरांना नव्या वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे. कारण मोनो रेल्वेला अखेर मुहूर्त सापडलाय. चेंबूर - वडाळा या ९ किमीच्या मार्गावरची मोनो रेल्वे ३१ डिसेंबरपर्यंत सुरु होणार असल्याचं एमएमआरडीएचे आयुक्त युपीएस मदान यांनी स्पष्ट केलंय.

दिवाळीनंतर सुरू होणार मुंबईकरांची `मोनो`वारी!

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 08:12

अखेर अनेक डेडलाईन पार करणारी मोनो रेल्वे आता नोव्हेंबरमध्ये सुरु होणार असल्याचा छातीठोक दावा ‘एमएमआरडीए’नं केलाय.

पुढील महिन्यात मुंबईकरांना मोनोरेल यात्रा

Last Updated: Monday, October 7, 2013, 23:34

अखेर मुंबईकरांना मोनो रेल्वेमधून प्रवास करण्याची संधी नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहे. मोनो रेल्वेची सर्व कामे पूर्ण झाली असल्याचा छातीठोक दावा एमएमआरडीएने केला आहे.

`एमएमआरडीए`चे खड्डे पालिका बुजवणार!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 12:43

मुंबईत मोनो-मेट्रोचं काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कामात मुंबई महानगर प्रदेशिक प्राधिकरणानं (एमएमआरडीए) टंगळमंगळ केलीय. त्यामुळे आता हे काम शेवटी पालिकेनंच हाती घेतलंय.

अखेर इस्टर्न फ्री-वेच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला!

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 09:04

गेले काही दिवस उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेला बहुचर्चित ईस्टर्न फ्री-वे म्हणजेच पूर्व मुक्त मार्गाचे दोन टप्पे अखेर गुरुवारी १३ जूनला वाहतूकीसाठी खुले होत आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये रंगला कलगीतुरा

Last Updated: Friday, May 3, 2013, 17:54

सध्या आघाडीमध्ये एमएमआरडीए आणि म्हाडाच्या घरांची किंमत या मुद्यांवरुन कलगीतुरा रंगला आहे. राष्ट्रवादीनं एमएमआरडीएवर केलेली टीका काँग्रेसला झोंबलेली दिसते.

मोनोरेलचं `वेट अॅन्ड वॉच...`

Last Updated: Friday, March 1, 2013, 08:23

‘मोनोरेल’च्या भविष्यातील प्रकल्पांबद्दल एमएमआरडीएने ‘थांबा आणि वाट पहा’ अशी भूमिका घेतली आहे.

मोनो रेलसाठी थांबा आणि वाट पाहा!

Last Updated: Thursday, February 28, 2013, 20:43

मोनो रेल्वेच्या भविष्यातील प्रकल्पांबद्दल एमएमआरडीएने थांबा आणि वाट पहा अशी भुमिका घेतली आहे. मोनोरेल्वेला मिळणारा नागरीकांचा प्रतिसाद तसंच मोनोरेल्वेची सेवा हाताळण्याचा अनुभव लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेणार असल्याचं एमएमआरडीएचे मावळते आयुक्त राहुल अस्थाना ह्यांनी स्पष्ट केलंय.

डोंबिवली - ठाणे खाडी पुलाला अजून परवानगीच नाही!

Last Updated: Thursday, January 31, 2013, 19:41

डोंबिवली - ठाणे खाडी पुलाला कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचं एमएमआरडीएनं स्पष्ट केलं आहे. या प्रकल्पाबाबत केवळ चर्चा सुरू असल्याचं एमएमआरडीनं म्हटलंय.

दिल्ली मेट्रोला १० वर्ष पूर्ण; मुंबई मात्र लटकलेलीच!

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 16:14

दिल्लीतील सार्वजनिक वाहतुकीचा मानबिंदू ठरलेल्या मेट्रोला सोमवारी १० वर्ष पूर्ण झाली. २४ डिसेंबर २००२ रोजी दिल्ली मेट्रो सुरु झाली होती. दिल्ली मेट्रो यशस्वितेचे मैलाचे दगड सर करीत असताना मुंबई मेट्रोला मात्र अजूनही मुहूर्त मिळालेला नाही.

‘२०१३ मध्ये धावेल मेट्रो रेल’

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 14:26

मुंबईतल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचं काम रेंगाळल्याची कबूल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. हे काम मार्च 2012 पर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं. मात्र आता 2013 पर्यंत हे काम पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय.

मुख्यमंत्र्यांनी घेतला MMRDAच्या कामाचा आढावा

Last Updated: Tuesday, June 12, 2012, 11:48

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर नालेसफाईची कामं पूर्ण झाली नसल्याचं चित्र आहे. पावसाळ्याच्या तोंडावर सुरु असलेल्या या नालेसफाई आणि इतर कामांवरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेंकावर जबाबदारी ढकलत आहेत.

पावसाची साद, MMRDAचा वाद

Last Updated: Monday, June 4, 2012, 14:25

एमएमआरडीए आणि पावसाळ्यातील वाद हे समीकरण नित्याचे झालंय. मेट्रो आणि मोनो रेल्वेचं काम सुरू असलेल्या मार्गातील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे त्रास होणार असल्याची तक्रार नागरिक पावसाळा सुरू होण्याच्या आधीपासूनच करायला लागले आहेत.

अखेर महाराष्ट्रातही 'गुजरात पॅटर्न'

Last Updated: Wednesday, March 7, 2012, 11:17

गुजरात किंवा गुजरातच्या प्रगतीचा विषय काढताच राज्य सरकार नेहमीच नाक मुरडत असते. मात्र आता हेच राज्य सरकार गुजरातने राबवलेला पुनर्वसनाचा पॅटर्न राज्यामध्ये राबवणार आहे.

एमएमआरडीएचा सायकल ट्रॅक... कशासाठी ?

Last Updated: Saturday, January 14, 2012, 20:50

साडेसहा कोटी रुपये खर्चुन बांधण्य़ात आलेल्या या सायकल ट्रॅकवर एकही सायकल धावलेली नाही. एमएमआरडीएनं मोठा गाजावाजा करीत हा ट्रॅक बांधला. मात्र त्याचा कोणताही उपयोग होत नसल्याचं उघ़ड झालं आहे.

अण्णांचे मुलुखमैदान होतयं तयार...

Last Updated: Sunday, December 25, 2011, 13:56

MMRDA मैदान अण्णांच्या उपोषणासाठी सज्ज होत आहे. आयएसीनं उपोषणाचं स्टेज आणि इतर गोष्टींचा आराखडा बनवला आहे. अण्णांच्या प्रत्यक्ष उपोषणाची जागा, मिडीयाला दिली जाणारी जागा, उपोषणाला येणाऱ्या लोकांची बसायची जागा कशी आणि कुठे असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

अण्णांचे उपोषण, मैदान भाड्यात सूट नाही

Last Updated: Saturday, December 24, 2011, 08:48

एमएमआरडीए मैदानाच्या भाड्यात सूट देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला सांगु शकत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. इंडिया अगेनस्ट करप्शनशी संलग्न असलेल्या जागृती नागरिक मंचाने बांद्रा कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मोफत किंवा सवलतीच्या दराने मिळावं अशी याचिका दाखल केली होती. यासंबंधी निर्णय दिल्यास तो संसदेच्या कामात हस्तक्षपे ठरेल असं उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटलं आहे.

'एमएमआरडीए'साठी अण्णांना 'मनसे' पाठिंबा

Last Updated: Thursday, December 22, 2011, 19:51

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा हेतू स्वच्छ आहे. त्यामुळं राज्य सरकारनं त्यांना त्यांच्या आंदोलनासाठी एमएमआरडीए मैदान सवलतीच्या दरात उपलब्ध करुन द्यावं अशी भूमिका मनसेनं घेतलीय.

अण्णांच्या आंदोलनाला सूट देऊ नका - माणिकराव

Last Updated: Thursday, December 22, 2011, 05:23

अण्णा हजारे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा आंदोलनासाठी सज्ज झाले असल्याने काँग्रेस पुन्हा धासतावले आहेत असेच दिसून येते, कारण की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी अण्णाचे मुंबईत MMRDA मैदानात होणारे आंदोलनाला कोणत्याच प्रकारची सूट देऊ नये असे वक्तव्य केले आहे.

एमएमआरडीएचं भाडं, उपोषणाचं अडतंय घोडं

Last Updated: Tuesday, December 20, 2011, 13:48

लोकपालसाठी सरकारची धावाधाव सुरु असताना अण्णा आंदोलनावर ठाम आहेत. त्यासाठी त्यांनी मुंबईत बीकेसीच्या एमएमआरडीए मैदानाची निवड केली असली तरी MMRDAनं १५ दिवसांसाठी परवानगी देताना भाडंही आकारलंय.