Last Updated: Wednesday, February 20, 2013, 08:38
www.24taas.com, विलेपार्ले पश्चिम रेल्वे मार्गावर विलेपार्ले इथं ट्रॅकवर काम करणारे दोन कर्मचारी ट्रेनखाली चिरडले गेल्यानं संतप्त प्रवाशांनी रेल्वेच्या मेटरमनला बेदम मारहाण केलीय.
ही ट्रेन पश्चिम मार्गावरून चर्चगेटकडे जात होती. यावेळी अनावधानानं रेल्वे ट्रॅकवर काम करणारे रेल्वेचेच दोन कर्मचारी ट्रेनखाली आले आणि त्यांचा यात मृत्यू झाला. हा प्रकार पाहून तिथं उपस्थित असलेल्या लोकांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी मोटरमनला मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, मोटरमनने एफआयआर नोंदवण्यास नकार दिलाय तर दुसरीकडे मारहाण करणाऱ्या काही लोकांची छायाचित्र पोलिसांना मिळालीत. त्याप्रमाणे दोषींवर पोलीस कारवाई करणार आहेत. दरम्यान, यानिमित्ताने मोटरमन असोसिएशनने मोटरमन्सच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केलाय.
First Published: Wednesday, February 20, 2013, 08:38