Last Updated: Sunday, March 3, 2013, 19:44
www.24taas.com, मुंबई ‘गुजरातमध्ये गुंतवणूक आणि नरेंद्र मोदींचं समर्थन बंद करा... अन्यथा…’ अशी धमकी देणारं पत्र रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना मिळालंय. `इंडियन मुजाहिदीन` या दहशतवादी संघटनेनं हे पत्र अंबानींना धाडलंय. तसंच इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी कार्यकर्ता दानिश याची तात्काळ सुटका केली जावी अशी मागणीही या पत्रात केली गेलीय.
`इंडियन मुजाहिदीन`या दहशतवादी संघटनेकडून पाठविलेले धमकीच पत्र मुकेश अंबानी यांना रविवारी मिळाले आहे. गुजरातमध्ये तुम्ही अशीच गुंतवणूक करीत राहिला आणि मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे समर्थन करीत राहिल्यास याची मोठी किंमत मोजावी लागेल. तसेच त्यांचे मुंबईतील `अल्टामाऊंट` रस्त्यावरील ‘अॅंन्टेलिया’ निशाण्यावर असल्याचंही धमकीत सांगण्यात आलंय. इंडियन मुजाहिद्दीनचा सल्ला धुडकावल्यास जीवाला मुकावं लागेल, असंही या पत्रात म्हटलं गेलंय.
‘नरिमन पॉईंट’ इथल्या रिलायन्सच्या ऑफिसमध्ये एका अज्ञात व्यक्तीनं हे पत्र टाकल्याचं सांगण्यात येतंय. हे पत्र इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे. पोलीस या पत्राची चौकशी करत आहेत.
First Published: Saturday, March 2, 2013, 11:16