मुंबईत बेस्ट बसच्या भाड्यात वाढ , Mumbai Best bus fare hike

मुंबईत बेस्ट बसच्या भाड्यात वाढ

मुंबईत बेस्ट बसच्या भाड्यात वाढ
www.24taas.com, मुंबई

मुंबईकरांच्या खिशाला आणखी चाट पडणार आहे. महागाईचा पुन्हा एकदा भडका उडाला आहे. मुंबईच्या बेस्ट बसच्या भाड्यात १ एप्रिलपासून वाढ होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी जास्त होणाऱ्या भाडेवाडीला सामोरे जावे लागणार आहे.

बेस्ट बसच्या भाड्यात १ रुपयाने वाढ करण्यात आली आहे. नव्याने होणारी ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे २ किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचं भाडं ५ वरून ६ रुपये होणार आहे. त्यानंतर प्रत्येक टप्प्याचं तिकीट १ रुपयानं महागणार आहे.

एसी बसचं पहिल्या २ किलोमीटरचं भाडं १५ वरून २० रुपयांवर जाणार आहे. यापूर्वी गेल्यावर्षी २७ एप्रिल रोजी बेस्टनं भाडेवाढ केली होती. तेव्हा तब्बल २ वर्षांनी बेस्टची तिकिटं महागली होती. तर आता जवळजवळ वर्षभरातच नव्याने भाडेवाढ करण्यात आली आहे.

First Published: Thursday, March 28, 2013, 16:44


comments powered by Disqus