वाडीबंदरला लागलेल्या भीषण आगीत गोदाम जळून खाक Mumbai - Fire at godown in Wadibandar

वाडीबंदरला लागलेल्या भीषण आगीत गोदाम जळून खाक

वाडीबंदरला लागलेल्या भीषण आगीत गोदाम जळून खाक
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईतल्या माझगाव इथं वाडीबंदर परिसरातील एका गोदामाला काल रात्री लागलेल्या भीषण आगीत गोदाम जळून खाक झालंय. या आगीचं नेमकं कारण अजून कळू शकलं नाही.

बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास माझगावमधील वाडीबंदर इथल्या नूरबाग भागात असलेल्या एका गोदामाला मोठी आग लागली. ही आग एवढी पसरली की पूर्ण गोदामाला आगीनं वेढलं. आगीच्या ज्वाळा खूप मोठ्या होत्या की त्यात संपूर्ण गोदाम जळून खाक झालं. आग विझवण्यासाठी पाच पाण्याचे टँकर आणि पाच फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र आगीची तीव्रता पाहता आणखी पाच पाण्याचे टँकर आणि पाच फायर इंजिन मागविण्यात आले.

रात्री उशीरा आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाचा जवानांना यश मिळालं. ही आग कशामुळं लागली याचा तपास सुरू आहे. यात जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात आलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, October 17, 2013, 16:11


comments powered by Disqus