Last Updated: Friday, August 30, 2013, 21:52
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई मुंबई गँगरेप प्रकरणातला पाच पैकी एक आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता निर्माण झालीय. त्याच्या भावानं दिलेल्या शाळेच्या दाखल्याच्या आधारे या आरोपीला आज ‘ज्युवेनाईल’ कोर्टात सादर करण्यात आलं. तिथून डोंगरीच्या बालसुधारगृहात त्याची रवानगी करण्यात आलीय.
दरम्यान, या आरोपीचं खरं वय ठरवण्यासाठी हाडांची वैद्यकीय चाचणी करण्यात आलीय. तसंच त्याच्या नातलगांनी सादर केलेल्या जन्मदाखल्याची शहानिशा पालिका अधिकारी करत आहेत. हे पुरावे त्याच्याविरुद्ध गेल्यास त्याची अन्य आरोपींसोबत चौकशी आणि त्यांच्या इतकीच शिक्षा होऊ शकते.
याबाबत पोलीस आशावादी असले, तरी सध्याच्या स्थितीत हा आरोपी स्वस्तात सुटण्याचीच शक्यता निर्माण झालीय.
दरम्यान, बलात्कार प्रकरणातल्या उर्वरित तीन आरोपींना आज कोर्टात सादर करण्यात आलं. या सर्वांना पाच सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. बालसुधारगृहात पाठवलेल्या आरोपींखेरीज अन्य चौघांवर अनैसर्गिक संबंध ठेवणं, पुरावे नष्ट करणं आणि गुन्हेगारी कट आखण्याचे आरोपही ठेवण्यात आलेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, August 30, 2013, 21:52