मुंबई गँगरेपः आज होणार आरोपपत्र दाखल Mumbai gang-rape case: Police to file chargesheet today

मुंबई गँगरेपः आज होणार आरोपपत्र दाखल

मुंबई गँगरेपः आज होणार आरोपपत्र दाखल
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

मुंबईत महिला फोटोग्राफर तरूणीवर झालेल्या गँगरेप प्रकरणी आज चारही आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. या चारही नराधमांविरोधात बलात्कार, गुन्हेगारी कटाचा आरोप लावला जाण्याची शक्यता आहे. तीन दिवसांपूर्वी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी १९ सप्टेंबर रोजी आरोपपत्र दाखल करणार असं स्पष्ट केलं होतं.

मागील महिन्यात २२ ऑगस्ट रोजी महालक्ष्मी इथल्या शक्ती मिलमध्ये कंपाऊंडमध्ये तरूणी आपल्या सहकाऱ्यासह फोटोशूट करण्यासाठी गेली होती. यावेळी पाच नराधमांनी या दोघांना अडवून तिच्या सहकाऱ्याला मारहाण करून पीडित तरुणीवर गँगरेप केला होता.

या प्रकरणी पोलिसांनी तीनच दिवसात पाचही आरोपींनी अटक केली. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचं स्पष्ट झालं. त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. तर इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. आरोपींविरोधात पोलिसांनी डीएनए चाचणी घेतलीय. तसंच घटनास्थळी आरोपींना नेऊन जबाबही नोंदवण्यात आलाय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, September 19, 2013, 08:03


comments powered by Disqus