'मुंबई गँगरेप प्रकरणातील आरोपींनाही फाशीच हवी', satyapal singh demand for death sentence for mumbai gangrape accus

'मुंबई गँगरेप प्रकरणातील आरोपींनाही फाशीच हवी'

'मुंबई गँगरेप प्रकरणातील आरोपींनाही फाशीच हवी'
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दिल्ली गँगरेप प्रकरणाशी मिळती जुळती घटना नुकतीच एका फोटो पत्रकाराच्या बाबतीत मुंबईत घडली. दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मुंबईत फोटो जर्नलिस्टवर झालेल्या गँगरेप प्रकरणातील आरोपींनाही फाशीचच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी खुद्द पोलीसच कोर्टात करणार आहेत.

मुंबई झालेल्या गँगरेप प्रकरणातील आरोपींनाही फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरु लागलीय. असं असताना खुद्द मुंबई पोलीस कमिशनर सत्यपाल सिंह यांनी मुंबई गँगरप प्रकरणातील आरेपींनाही फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी मुंबई पोलिसांच्यावतीनं कोर्टात करणार असल्याचं म्हटलंय. तर आरोपींना कमीत कमी फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रकरणाचा तपास अतिशय गंभीरतेनं केला जातोय, असंही त्यांनी म्हटलंय.



येत्या मंगळवारपर्यंत मुंबई पोलीस गँगरेप प्रकरणाचे आरोपपत्र कोर्टात दाखल करणार असल्याची माहितीही सिंह यांनी दिलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, September 14, 2013, 15:00


comments powered by Disqus