मुंबईत दोन विद्य़ार्थीनींवर सामूहिक बलात्कार, Mumbai gang rape of two school Girl students

मुंबईत दोन विद्य़ार्थीनींना रिक्षात कोंबून सामूहिक बलात्कार

मुंबईत दोन विद्य़ार्थीनींना रिक्षात कोंबून सामूहिक बलात्कार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जागेश्वरी येथे भरदिवसा शाळेजवळून दोन विद्यार्थीनींना रिक्षात ओढून कोंबले. त्यानंतर दोघींवर सामूहिक बलात्कार करण्यात आलाय. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले असून एक फरार आहे.

पुन्हा एकदा महिला सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आजही मुंबई महिलांसाठी अरसुक्षित असल्याचे पुढे आले आहे. जोगेश्‍वरीतील एका शाळेजवळून दोन शालेय मुलींना भरदिवसा रिक्षातून पळवून नेण्यात आले. त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला गेला. या धक्कादायक प्रकरानंतर जोगेश्वरीत पालकांना धक्का बसला आहे.

अल्ताफ याकूब पटेल (२६) , अरमान नफीज खान (२२) अशी या आरोपींची नावे आहेत. फरार असलेला तिसरा आरोपी रिक्षाचालक आहे. या तिघांनी दोन शालेय मुलींना दुपारी दीडच्या सुमारास ओशिवरातील बेहराम बाग गांधी शाळेजवळून जबरदस्तीने रिक्षात कोंबले. रिक्षातून ते या मुलींना तेथील मैदानाजवळ घेऊन गेले आणि त्यांच्यावर अत्याचार केला. तेथून हे आरोपी फरार झाले.

अटक करण्यात आलेला पटेल हा तडीपार गुंड असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याचा शोध घेत असताना खबर्‍याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी पटेलला आणि त्यापाठोपाठ खानलाही पकडले. याप्रकरणी पोलिसांनी या दोघांसह फरार आरोपींविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविला आहे. पटेल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध ११ घरफोडीचे गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्याला मुंबई तसेच उपनगरांतून एका वर्षासाठी तडीपारही करण्यात आले होते.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 8, 2014, 15:57


comments powered by Disqus