Last Updated: Wednesday, August 28, 2013, 16:23
www.24taas.com, झी मीडिया,मुंबई मुंबईत २२ वर्षीय महिला फोटोग्राफऱवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींना बुधवारी सकाळी घटनास्थळी (शक्ती मील) नेण्यात आले. त्याठिकाणी तुम्ही काय केलं, याची माहिती त्यांच्याकडून जाणून घेण्यात आली.
शक्ती मील कपाऊंडमध्ये पाचही आरोपींना आज बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी नेण्यात आले. यावेळी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. घटनास्थळी आणल्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींकडून त्यादिवशी काय झाले, याची माहिती घेतली.
प्रत्येकाकडून त्याने त्या दिवशी काय काय केले, याची माहिती संबंधित घटनास्थळावरून पोलिसांना दिली. गेल्या गुरुवारी संध्याकाळी मुंबईत महिला फोटोग्राफऱवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर पोलिसांनी पाचही आरोपींची स्केच जारी करण्यात आली होती. त्यानंतर एकाला अटक केल्यानंतर त्याच्या माहितीच्याद्वारे पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. या पाचही आरोपींना न्यायालयाने पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, August 28, 2013, 16:23