‘त्या’ नराधमानं आईसमोर दिली कू-कर्माची कबुली! Mumbai gang-rape accused tells mother he committed the crime

‘त्या’ नराधमानं आईसमोर दिली कू-कर्माची कबुली!

‘त्या’ नराधमानं आईसमोर दिली कू-कर्माची कबुली!
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

मुंबईत महिला फोटोग्राफर गँगरेप प्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीनं आपल्या आईसमोर आपल्या कू-कर्माची कबुली दिली. २१ वर्षीय कासिम शेख याला रविवारी नायर हॉस्पिटलच्या बाहेरून अटक करण्यात आली होती. सोमवारी त्याच्या आईनं त्याची भेट घेतल्यानंतर तो ढसढसा रडला आणि म्हटला, `होय! मी त्या मुलीशी चुकीचं वागलोयं...`

मुंबईत गुरुवारी संध्याकाळी झालेल्या गँगरेपनंतर पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सपाटा लावला. त्यात रविवारी कासिम शेख याला अटक करण्यात आली. गँगरेपमधला हा आरोपी मुख्य आरोपी मानला जातोय. कासिमला अटक झाल्याचं वृत्त त्याची आई चाँदबीबी यांना काही पत्राकारांकडून मिळाली. ही माहिती मिळताच चाँदबीबी आपल्या मुलाला भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचल्या आणि कासिमशी एकदा भेट घालून द्या अशी विनंती त्यांनी केली.

अखेर पोलिसांनी कासिम त्याच्या आईसमोर आणलं आणि त्या दिवशी काय घडलं ते सांग म्हणून बजावलं. तेव्हा होय, मी त्या मुलीशी चुकीचं वागलो, असं त्यानं सांगितलं. अखेर मी त्याला विचारलं की तू असं का केलंस, त्यावरं तो काही न बोलता खाली मान घालून रडत राहिला. त्याची ती अवस्था बघून मी खचून गेले, असंही चाँदबीबी म्हणाल्या.

चाँदबीबी या विधवा असून त्यांच्या तीन मुलांसोबत आग्रीपाडा इथं वास्तव्याला आहेत.

First Published: Tuesday, August 27, 2013, 12:42


comments powered by Disqus