मुंबई, गणपतीपुळेसाठी आता सी प्लेन सफर , Mumbai, gapatipule now travel by sea plane

मुंबई, गणपतीपुळेसाठी आता सी प्लेन सफर

मुंबई, गणपतीपुळेसाठी आता सी प्लेन सफर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी मुंबईकरांना आता थेट सी प्लेनमधून मुंबईची सफर करता येणार आहे. तसेच कोकणातलं तारकर्ली आणि गणपतीपुळे येथेही ही विमान सफर करता येणार आहे. ऑक्टोबरपासून मुंबई ते गणपतीपुळे अवघ्या ४५ मिनिटात पोहोचता येणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं अर्थात एमटीडीसीनं राज्यातलं पहिलं सी प्लेन आज लाँच केलं. १० मार्चपासून मुंबईकरांना यामधून प्रवास करता येणार आहे. चार सीटरचं हे सीप्लेन आहे. लोकांचा प्रतिसाद मिळाला तर सहा, नऊ आणि एकोणीस सीटरचं सीप्लेन सुरु केलं जाईल.

मुंबईतली ही नवी सीप्लेन राईड हे चांगलं गिफ्टही ठरू शकतं. एखाद्या वीकेण्डला तुम्हाला फॅमिली ट्रीपही या सी प्लेनमधून प्लॅन करता येईल. पहिल्या टप्प्यात जुहू ते अँबी व्हँली असा हा सीप्लेनचा प्रवास असणार आहे. १०मार्चपासून ही सेवा सुरु होणार असून यासाठी चार तो साडेचार हजार रुपये प्रवासभाडे असणार जूहू ते नरिमन पॉईंट ही सेवाही सुरु केली जाणार असून यासाठी साडेसातशे रुपये भाडे असेल.

कोकणातलं तारकर्ली येथेही सीप्लेनचा प्रवास करता येणरा आहे. ऑक्टोबरपासून मुंबई ते गणपतीपुळे ही सेवा सुरू होईल. अवघ्या ४५ मिनिटात णपतीपुळे पोहोचता येणार आहे. मुंबईहून गणपतीपुळ्याच्या आगामी फेरीसाठी अद्याप दर निश्चित करण्यात आलेले नाहीत. मात्र, संबंधी कंपनीला हवाई वाहतूक संचालनालय, संरक्षण मंत्रालय यांचीही परवानगी मिळाली आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Tuesday, February 25, 2014, 10:44


comments powered by Disqus