Last Updated: Tuesday, February 25, 2014, 09:42
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईत प्रवास करणे जिकरीचे होत आहे. वाहनांमध्ये होणारी वाढ आणि त्यामुळे ट्रॅफिक जामचा सामना. त्यातच रस्ते खराब असल्यामुळे खड्ड्यांमुळे प्रवास त्रासदायक होतो. यासर्वांमुळे तुम्हाला प्रवास नकोसा वाटतो. मात्र, हा प्रवास तुम्हाला नक्कीच हवाहवासा वाटेल. कारण बसमधून प्रवास कराल तोही समुद्रातून. हे स्वप्न नाही तर प्रत्यक्षात उतरलेले सत्य आहे.
राज्याला १० हजार किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे. रस्तामार्गाने या ठिकाणी जायचे झाल्यास बराचसा वेळ ट्रॅफिकमध्ये जातो, तसेच वारंवार वाहन बदलावे लागते. परंतु आता तुम्ही एकदा बसमध्ये चढलात की ही बसच समुद्री पाण्यावर तरंगत धावू लागेल. तुम्हाला एखाद्या सिनेमातील दृश्य वाटेल. मात्र, तसे नाही. मुंबईत या बससेवेची चाचणी घेण्यात आलेय.
महाराष्ट्र पर्यटन महामंडळ आता समुद्राच्या पाण्यावर धावणारी बस (ऍम्फिबियन बस) योजना राबविण्याच्या तयारी केली आहे. समुद्री पर्यटनास प्रोत्साहन देण्यासाठी ‘एमटीडीसी’ आणि ‘मेहेर कंपनी’च्यावतीने जुहूत काल देशातील पहिल्यावहिल्या सीप्लेन सेवेचा शुभारंभ अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मुळीक यांच्या हस्ते झाला.
समुद्री बससेवेसाठी खासगी प्रायोजकांच्या आम्ही शोधात आहोत. ही समुद्री बससेवा जगात अनेक देशांत चालते. शिवाय यासाठी वेगळे इन्फ्रास्ट्रक्चर बनवण्याचा खर्च नाही. त्यामुळे या बससेवेला प्राधान्य देण्यासाठी आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुळीक यांनी दिली.
या बससेवेसाठी आता रस्ते आणि समुद्राच्या पाण्यात अशा दोन्ही ठिकाणी चालणार्या बसेस आणि त्यासाठी समुद्रात उताराच्या जेटी उभाराव्या लागतील. गिरगावच्या समुद्रातही तरंगणार्या जेटी अशा बसेससाठी उभारता येतील. जेव्हा गरज नसेल त्यावेळी जेटी काढतासुद्धा येऊ शकतील, अशीही योजना आहे, जगदीश पाटील यांनी स्पष्ट केले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, February 25, 2014, 09:39