सेंट्रल रेल्वे संथ, मुंबईकर मेगाब्लॉक , Mumbai, mega blocks,

सेंट्रल रेल्वे संथ, मुंबईकर मेगाब्लॉक

सेंट्रल रेल्वे संथ, मुंबईकर मेगाब्लॉक
www.24taas.com,मुंबई

मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे मेगाब्लॉक होत आहेत. सेंट्रेल मार्गावरची वाहतूक संथ झालीय. त्यामुळं कल्याण ठाणे प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत आहेत.

रेल्वेनं अभियांत्रिकी कामासाठी ठाणे ते दिवा स्टेशनदरम्यान मेगाब्लॉक घेतलाय. त्यामुळे जलद मार्गावरची वाहतूक धीम्या मार्गावरून वळवण्यात आलीय. याचा फटका प्रवाशांना बसतोय. रेल्वेची वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे.

आज रविवार असल्यानं नोकरदारवर्गाला याचा फारसा फटका बसला नसला तरी खाजगी क्षेत्रात काम करणारे कर्मचा-यांना मात्र सलग दोन दिवस लेटमार्कला सामोरं जावं लागतय.

First Published: Sunday, December 30, 2012, 10:09


comments powered by Disqus