Last Updated: Wednesday, August 28, 2013, 11:28
www.24taas.com , झी मीडिया, मुंबईगोरेगावला प्लॅटफॉर्म नंबर ३वर लोकलची वाट पाहात उभ्या असणार्याह एका महिला प्रवाशावर हल्ला झाल्याची घटना गोरेगाव रेल्वे स्थानकात सोमवारी घडली होती. मात्र तो हल्ला नसून एक अपघात असल्याचं समोर आलंय.
संध्याकाळी पावणेआठच्या सुमारास गोरेगाव रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर ३ वर विरार लोकलसाठी उभी असलेल्या रुपाली शिंदे या तरुणीवर हल्ला झाल्याचं वृत्त पसरलं होतं. मात्र, तपासानंतर हा हल्ला नसल्याचं स्पष्ट झालंय. एका अनोळखी प्रवाशाच्या हातातील वस्तू या महिला प्रवाशाला लागल्यानंच ती जखमी झाल्याचं रेल्वे पोलिसांनी सांगितलंय. लोकल प्लॅटफॉर्मवर आली असता लोकल पकडण्याच्या वेळी असलेल्या गर्दीत तिच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर जखम झाली. मात्र तोपर्यंत शिंदे यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी वार्या्सारखी पसरली होती.
सध्या मुंबईत महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. महिला फोटोग्राफरवरील गँगरेप, त्याआधी लोकलमध्ये अमेरिकन महिलेवर झालेला हल्ला, या आणि अशा घटनामुळं महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावलीय. त्यामुळंच अशा अफवा सुद्धा पसरतायेत. एकूणच गोरेगाव स्टेशनवरील प्रकार हा हल्ला नसून अपघात असल्याचं स्पष्ट झालंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, August 28, 2013, 11:28