Last Updated: Thursday, August 16, 2012, 23:30
www.24taas.com, मुंबईमुंबईवर पाऊस बरसणार आहे. कारण पालिकेने तसा निर्णय केला आहे. पाणीटंचाईचं संकट दूर करण्यासाठी अखेर मुंबई पालिकेनं कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेत झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
मुंबईत पाऊस चांगला झाला नसल्याने पाणीची समस्या निर्माण होणार आहे. त्यातच मुंबईत गेल्या अडीच महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही.
सप्टेबरमध्ये १२ ते १५ दिवस कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. यासाठी १२ कोटी रुपये खर्च करण्याची तयारीही केलीय. दरम्यान, कृत्रिम पावसाचा निर्णय घेण्यात आला असला तरी हा प्रयोग जोवर यशस्वी होत नाही, तोवर पाणीकपात कायम राहणार आहे.
भातसा आणि वैतरणा नदीच्या पात्रात हा प्रयोग करण्यात येणार आहे.सध्या मुंबईच्या धरणांमध्ये २६० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. तसंच भविष्यात कुठल्याही टंचाईला सामोरं जावं लागू नये म्हणून १० टक्के पाणीकपातही सुरु आहे.
First Published: Thursday, August 16, 2012, 23:30