मुंबई पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे काम, विरोधकांना धुपाटणे

Last Updated: Thursday, March 6, 2014, 09:19

मुंबई महापालिकेतील सत्तेचा वापर शिवसेनेचे पदाधिकारी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी व्यवस्थितपणे करून घेत आहेत. या पदाधिका-यांनी आपल्या मतदार संघातील वॉर्डसाठी कोट्यवधी रुपये बजेटमधून वळवले आहेत. तर दुसरीकडे विरोधी नगरसेवकांच्या वॉर्डसाठी तुटपुंजी तरतूद केलीय. याविरोधात विरोधकांनी पालिका आयुक्त आणि निवडणूक आयोगकडं दाद मागितलीय.

मुंबई पालिकेची तिजोरी फुल्ल, कामांची बोंब

Last Updated: Friday, February 7, 2014, 16:57

मुंबई महापालिकेनं तब्बल ३१ हजार कोटी रुपयांचे बजेट सादर केले आहे. तर बजेटहून अधिक म्हणजे तब्बल ३३ हजार कोटी रुपयांच्या मुंबई महापालिकेच्या ठेवी विविध बँकांमध्येही आहेत. यावर सामान्यांचा विश्वास बसणार नाही. म्हणजे तिजोरी फुल्ल असली तरी विकास कामात मात्र उदासिनता दिसत आहे.

मुंबई महापालिकेत लघुलेखक पदासाठी थेट भरती

Last Updated: Thursday, January 9, 2014, 20:12

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील ७५००-२०२०० रूपये अधिक ग्रेड पे २४०० रूपये अधिक भत्ते आणि वेतन श्रेणीतील लघुलेखक (कनिष्ठ श्रेणी) या संवर्गातील प्रवर्गनिहाय सध्या रिक्त असलेली तसेच संभाव्य रिक्त होणारी एकूण ९८ पदे भरण्यात येणार आहेत.

मुंबई पालिकेत आरोग्य विभागात भरती

Last Updated: Friday, December 13, 2013, 11:08

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांर्तगत कुटुंब कल्याण व माता बाल संगोपन आणि विशेष अधिकारी (कुटुंब कल्याण) या विभागाच्या आस्थापनेवरील सहाय्यक परिचारिका प्रसविका या संवर्गातील रिक्त आणि संभाव्य रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

मुंबई पालिका पाडणार कृत्रिम पाऊस

Last Updated: Thursday, August 16, 2012, 23:30

मुंबईवर पाऊस बरसणार आहे. कारण पालिकेने तसा निर्णय केला आहे. पाणीटंचाईचं संकट दूर करण्यासाठी अखेर मुंबई पालिकेनं कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेत झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

मुंबईकरांवर कराचा बोजा लादला

Last Updated: Saturday, May 12, 2012, 13:15

मुंबई महापालिकेनं मुंबईकरांवर वाढीव मालमत्ता कराचा बोजा लादलाय. पण त्याचवेळी महापालिकेनं तब्बल आठ हजार १५ कोटी ८२ लाखांची थकबाकीच वसूल केली नसल्याचं उघड झालंय. मुंबई महापालिकेच्या या कारभारावर मुंबईकर संतप्त आहेत.

मुंबई पालिकेचे बजेट, पाणी, वीज महाग?

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 13:13

मुंबई महापालिकेचा २०१२-१३ चा अर्थसंकल्प पालिका आयुक्त सुबोध कुमार स्थायी समितीत सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात पाणी आणि वीज महागण्याची शक्यता वर्तवण्यात येते.