पोलिसांनी उधळला बलात्काऱ्याचा दुहेरी हत्येचा कटMumbai police dissipate Rapiest complot of Victims Mu

पोलिसांनी उधळला बलात्काऱ्याचा दुहेरी हत्येचा कट

पोलिसांनी उधळला बलात्काऱ्याचा दुहेरी हत्येचा कट
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

आपल्या विरोधात तक्रार देणाऱ्या आणि साक्ष देणाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका उच्चशिक्षित व्यक्तिला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अमित जैन असे या आरोपीचं नावं असून, तो बलात्कार प्रकरणा़त जेलमध्ये होता. त्याने काही करण्याआधीच पोलिसांनी अमितच्या मुसक्या आवळल्या आणि पुढील अनर्थ टळला.

मुंबई पोलिसांनी अमितकडून दोन देशी कट्टे जप्त केलेत. या कट्ट्यांच्या सहाय्यानं आपल्या विरोधात तक्रार देणाऱ्या तरूणीला आणि तिच्या कुटुंबाला संपविण्याचा कट रचला होता. त्यासाठी अमितनं दोन कट्टे मध्यप्रदेशातून आणले. ठरल्याप्रमाणे तो त्या दोघांना गोळ्या घालण्यासाठी दबा धरून बसला असताना पोलिसांनी अमितला पकडलं.

अमित जैन हा बीई इलेक्ट्रॉनिक्स असून त्यानं एमबीए केलंय. २०१२ साली तो एका अंतरराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर कामावर असताना त्यानं एका मुलीवर बलात्कार केला होता. त्या प्रकरणी अमितला शिक्षा झाली होती. एक वर्षापासून तो जामिनावर बाहेर आहे. दरम्यान आरोपी अमितने पीडित तरूणी आणि तिच्या कुटुंबाला ठार मारण्याचा प्लान रचला. जेलमध्ये असताना त्याची एकाशी ओळख झाली होती. त्याच्या सहाय्यानं अमितनं मध्य प्रदेशवरुन दोन देशी कट्टे विकत घेतले होते.

अमितने दोन लोकांना मारायचं ठरवलं होतं. त्याने दुसरा कट्टा का आणला होता, त्याचा तपास पोलीस सध्या करतायेत. पोलिसांना मिळालेल्या माहितानुसार अमित त्या तरुणीला आणि तिच्या वडीलांवर भर रस्त्यात गोळ्या झाडणार होताच. शिवाय त्याला पकडण्यासाठी किंवा त्या दोघांना वाचवायला येणाऱ्या लोकांवरही गोळ्या झाडण्याचा अमितचा प्लान होता. जर पोलिसांनी त्याला ही घटना घडण्याआधीच पकडलं नसतं तर आज अनेक लोकांची हत्या अमितनं केली असती आणि मुंबई हादरवून सोडली असती. पण पोलीस आधिच सतर्क झाले आणि एक खूप मोठा अनर्थ टळला. त्यामुळं पोलिसांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, May 24, 2014, 19:51


comments powered by Disqus