Last Updated: Monday, November 25, 2013, 08:39
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईपत्नीचे विवाहबाह्य संबंध उघड झाल्यानंतर निराश झालेल्या जयेश राऊत (२९) या सिद्धिविनायक मंदिराजवळच्या फुलविक्रेत्याने सायन, प्रतीक्षानगरातील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. विशेष म्हणजे आत्महत्येपूर्वी जयेशने स्वत:ची ४५ मिनिटांची व्हिडीओ क्लिप मोबाइलमध्ये शूट केली होती.
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला सोडून जाऊस नकोस. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, असे रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये केले आहे. तसेच जयेशने घेतलेला गळफासही या क्लिपमध्ये कैद झाला आहे.
ही व्हिडीओ क्लिप पाहून वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांनी पत्नी तृप्ती (२३) आणि तिचा प्रियकर राजेश वर्मा (३८) यांना आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमान्वये अटक केली. मात्र त्याचवेळी जयेशची या दोघांनी हत्या केल्याचा आरोप राऊत कुटुंबीयांनी केला आहे.
आत्महत्येपूर्वी जयेशने तृप्तीला बरेच एसएमएस केले. मात्र उत्तर न आल्याने अखेर त्याने मी आत्महत्या करतोय, आयुष्य संपवतोय असा अखेरचा एसएमएस केला. हा एसएमएस वाचून तृप्तीने जयेशच्या नातेवाइकांना सतर्क केले. ते घरी येईपर्यंत जयेशचा मृत्यू झाला होता.
फक्त घाबरवणार होता, पण.....गळ्याभोवती दोरी अटकवताना पहिल्यांदा त्याने गळ्यावर बनियान बांधली. मात्र ऐनवेळी ही बनियान निसटली आणि त्याचा जीव गेला. जयेशने तयार केलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये ही बाब दिसत असल्याने त्याने केवळ तृप्तीला घाबरवण्यासाठीच हा आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, November 25, 2013, 08:39