इस्टरच्या हत्येचं गूढ उकललं, आरोपीला अटक, Mumbai techie Esther Anuhya rape-murder case cracked, one

इस्टरच्या हत्येचं गूढ उकललं, आरोपीला अटक

इस्टरच्या हत्येचं गूढ उकललं, आरोपीला अटक
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

दोन महिन्यांपूर्वी कुर्ला टर्मिनसवरून रहस्यमयरित्या गायब झालेल्या आणि नंतर मृत अवस्थेत सापडलेल्या इस्थर अनुह्या मृत्यू प्रकरणाचा छडा लागल्याचं मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी माहिती दिलीय.

या प्रकरणी नाशिकमधून चंद्रभान सानप नावाच्या एका व्यक्तीला अटक केलीय. सानपला १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. सीसीटीव्हीमध्ये इस्थरसोबत दिसत असलेली हीच ती व्यक्ती असल्याची शक्यता वर्तवली जातेय. अधिकृतरित्या या माहितीला कुणीही दुजोरा दिला नसून याविषयी आज संध्याकाळी पोलीस पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहेत.

काय आहे प्रकरण

सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेली २३ वर्षीय इस्थर ही मूळची हैदराबादची राहणारी होती. ५ जानेवारी रोजी पहाटे ती कुर्ला टर्मिनसवर उतरल्यानंतर त्या दिवसापासून ती गायब होती... आणि अचानक १० दिवसांनी इस्थरचा मृतदेह कांजूरमार्ग आणि भांडुपदरम्यान इस्टर्न एक्स्प्रेस हायवे लगत असलेल्या झुडूपात सापडला.

पोलिसांनी या प्रकरणी जंग जंग पछाडलं पण, त्यांच्या हाती काहीच लागत नव्हतं. सीसीटीव्ही फुटेजमध्ये इस्थरसह जी व्यक्ती ५ जानेवारीच्या फुटेजमध्ये दिसून आलं त्या व्यक्तीचा फोटो राज्यातल्या सर्व पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता नाशिकमधल्या एका पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्हीवरून मिळालेल्या फोटोशी मिळत्या-जुळत्या चंद्रभान सानपला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

चंद्रभान सानप हा मूळचा नाशिकचा असून तो भांडुपचा रहिवासी आहे. रेल्वेत चोरी आणि दरोडा घालण्याच्या केसेस त्याच्यावर दाखल आहेत. क्राईम ब्रान्चनं त्यांच्याजवळ असलेल्या पुराव्याच्या आधारावर इस्थरची हत्या करणारी हीच ती व्यक्ती असल्याचं सांगत चंद्रभानला अटक केलीय. स्टेशनवर जाऊन इस्थरला मदतीची विचारणा करुन रिक्षामधून एक्सप्रेस हायवेवर नेवून तिच्यावर बलात्कार करुन नंतर तीची हत्या करण्यात आली, अशी माहिती मिळतेय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, March 3, 2014, 13:37


comments powered by Disqus