मुंबईसह उपनरांत पावसाच्या सरी, Mumbai, Thane & Navi Mumbai in rain

मुंबईसह उपनरांत पावसाच्या सरी

मुंबईसह उपनरांत पावसाच्या सरी
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबई,ठाणे आणि नवी मुंबईत आज पहाटे अवकाळी पावसानं हजेरी लावली. मुंबईतल्या शहर भागातल्या परळ वरळीसह वांद्रे आणि बोरिवली भागात पावसाच्या सरी कोसळल्या.

ठाणे आणि नवी मुंबईतही पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे. फेब्रुवारी महिन्यात आलेल्या या पावसानं पहाटे कामासाठी बाहेर पडणारे नोकरदार तसेच विक्रेते यांची तारंबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या तापमानात घट झालीय. त्यातंच आज पावसानं हजेरी लावल्यानं तिन्ही ऋतुंचा अनुभव मुंबईकरांना घ्यायला मिळतोय.

विशेष म्हणजे आज व्हॅलेंटाईन डे आहे, आजच्या दिवशीच पाऊस कोसळत असल्यानं आपल्या व्हॅलेंटाईन सोबत पावसाचा आनंद लुटण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, February 14, 2014, 08:31


comments powered by Disqus