Last Updated: Friday, December 20, 2013, 09:05
www.24taas.com, देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबईतुम्ही एखाद्या दिवशी मुंबई मध्ये प्रचंड ट्रॅफिक जाममध्ये अडकलात आणि घरी पोहचायला जर 2 ते 3 दिवस लागले तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण मुंबई मध्ये रोज वाढणा-या शेकडो वाहनांमुळे भविष्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट....
चीनच्या बीजिंगमध्ये १४ ऑगस्ट २०१० रोजी बीजिंग-तिबेट हायवेवर हा ट्रॅफिक जाम झाला होता आणि तब्बल १० दिवस हा ट्रॅफिक जाम होता. शंभर किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. हे सगळं दाखवण्याचं आणि सांगण्याचं कारण म्हणजे हेच चित्र तुम्हाला लवकरच मुंबईत दिसू शकतं. कारण गेल्या गेल्या काही वर्षांच्या तुलनेत 2012 -2013 मध्ये विक्रमी गाड्यांची नोंदणी झालीय.
- मध्य मुंबईत 50 हजार339
- पश्चिम उपनगरात -82 हजार781
- पूर्व उपनगरात- 47 हजार 334 अशा
- एकूण – 1 लाख 80 हजार 554 नव्या वाहनांची नोंदणी झालीय. मुंबईतली वाढलेली वाहनांची संख्या पाहता मुंबईचा प्रवास बीजिंगच्या ट्रॅफिक जामच्या दिशेनं चाललाय का, असा प्रश्न पडतोय.
वाहनांसाठी लगेच मिळणारं कर्ज आणि सुलभ हप्ते यामुळे दिवसेंदिवस वाहन खरेदी करणं सोपं झालंय. त्याशिवाय बदलत्या जीवनशैलीत स्वतःचं वाहन असणं ही गरज झालीय. त्यामुळे वाहनांची संख्या वाढतेय.... त्यामुळे प्रदूषणही वाढतंय..... पण जगरहाटीच्या रॅट रेसमध्ये याचा विचार करायला वेळ कुणाकडे आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, December 20, 2013, 08:50