Last Updated: Thursday, March 28, 2013, 12:15
www.24taas.com, मुंबई स्वयंसेवक, बँक कर्मचारी आदींना सुपरव्हिजनचं काम देत मुंबई विद्यापीठाची टीवायबीकॉमची परीक्षा सुरू झालीय.
विद्यापीठानं या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी कंबर कसलीय. प्राध्यापकांच्या संपामुळे विद्यापीठानं ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आणि वेळापत्रकानुसारच परीक्षा व्हाव्यात, अशी विद्यापीठाची भूमिका आहे. परीक्षाकेंद्रांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. परीक्षा केंद्राबाहेर प्राध्यापक निदर्शनं करताना दिसत होते.
सुरक्षेच्या कारणास्तव पहिल्यांदाच पदवी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत पालकांचीही केंद्रावर गर्दी दिसत होती.
First Published: Thursday, March 28, 2013, 12:15