Last Updated: Thursday, March 28, 2013, 12:09
www.24taas.com, मुंबई संपकरी प्राध्यापकांना राज्य सरकारनं चांगलाच दणका दिलाय. संपकरी प्राध्यापकांचे ५५ दिवसांचं वेतन कापण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.
गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना वेठीस धरत प्राध्यापक संपावर अडून बसलेत. परीक्षांवर बहिष्कार टाकल्याने विद्यार्थ्यांचंही मोठं नुकसान झालंय. त्यामुळे अखेर राज्यसरकारनं या संपकरी प्राध्यापकांवर कारवाईचा बडगा उगारलाय.
First Published: Thursday, March 28, 2013, 12:09